HOW MUCH SHOULD ARTISTS INDULGE IN SOCIAL MEDIA

२०२० हे वर्ष आपल्या पोटात भलतंच काहीतरी घेऊन आलं. मार्च सरेस्तोवर डिसेंबर आला देखील. याचं काळात social media च्या pressure नी कहर केला आणि त्यातून हा लिखाण प्रपंच घडला. हे मनोगत आहे. disclaimer या लिखाणाद्वारा कोणालाही कमी लेखण्याचा, टीका करण्याचा उद्देश अजिबात नाही.
“शरीर स्वास्थ्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो” हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि मान्यही आहे.( कोरोना नी त्याचं महत्व अधिकच अधोरेखित केलं ) पण किती सूर्यप्रकाश अंगावर घ्यायचा? शरीराची कातडी काळवंडून, निस्तेज होईपर्यंत? बाजारात मिळणाऱ्या cream नी त्वचेचा कोरडेपणा जाईलही, पण आतूनच ओलावा कमी झाला असेल तर बाहेरून कितीही मलमं लावली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही.
असंच काहीसं आपलं ( कलाकार, विशेषतः नर्तक ) social media च्या बाबतीत झालं आहे. Facebook, Instagram यावर ‘सतत दिसण्याच्या’ नादात आपण आपली आतली सर्जकता विसरु लागलो आहोत. ‘इतर कलाकार’ जे करतात त्यातीलच एक कल्पना घेऊन नवीन काहीतरी केलं जातं. ते खरंच ‘नवीन’ असतं का? त्याचा दर्जा काय असतो? ते आपल्यासाठी असतं का लोकांसाठी या सगळयाचा विचारच केला जात नाही. कारण visibility महत्वाची. social media चं अस्तिव आणि त्याहीपेक्षा त्याचं महत्व मी नाकारत नाही. माझा हा मुद्दाही मी blog वरंच मांडतीए ना! so….आणि नाकारणारी मी कोण? तरीही एक व्यक्ती (sensible) आणि एक बऱ्यापैकी कलाकार म्हणून मला हे लिहावंसं वाटलं.

“आज मी रियाज करताना एक अमूक गोष्ट केली तमूक गोष्ट केली, असं  म्हणत असताना या  ‘अमूक ‘ किंवा ‘तमूक ‘ गोष्टी अविभाज्य भागच आहेत.” म्हणजे त्यात खरचंच काही विशेष नसतं, त्या ऐवजी आपली एखादी पारंपरिक बंदिश (विशेष असलेली) गुरूंकडून खूप आत्मीयतेनी शिकलेली, कठीण जाणारी रचना जर share केली तर? जर तुम्ही असं sharing जर करतही असाल तर मग नक्की काय टाकावं आणि काय नाही याचं तारतम्य बाळगलं तर खरचंच एक सर्वांग सुंदर, अभ्यासपूर्ण आणि परिपूर्णतेकडे जाणाऱ्या कलाकृतींची निर्मिती व्हायला मदत होईल. अमक्याला आमके हजार followers /viewers आहेत हे सततचं पाहिल्याने एक न्यूनतेची किंवा स्पर्धेची भावना तयार होत असणार, तेही टळेल.

कोवळ्या उन्हात बसून गरज असेल तेवढंच उन्ह अंगावर घ्यावी, नाहीतर sun burns होतील. तसंच कलाही नको त्या अहमीकेमुळे जळतीए. तिचा हळू हळू दर्जा घसरतोय, ऱ्हास होतोय. (slow poisoning सारखा) posts टाकाव्यात, पण काहीही posts टाकायला ‘इतरे जन’ आहेत ना! ती जबाबदारी आपण कलाकारांनी घ्यायची गरज नाही. नवीन वर्षात आपणच ठरवायचं की ‘कलाकार’ म्हणून समृद्ध व्हायचं; का ‘कल्लाकार’ म्हणून! आपण जे post करतो त्यात तारतम्य बाळगूयात. ईश्वरानी कलाकार म्हणून दिलेल्या देणगीचा विनम्रपणे स्वीकार करून बुद्धीचा वापर करूया. sun burn होऊ न देता artists चे मन आणि बुद्धीची ‘म’,’ब’ जीवनस्तवं वापरूयात.

Maneesha Abhay

Director, Sukruti Kathak Dance Academy.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *